माता पालक मेळावा

म ए सो सिनियर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त
दि 9 मार्च 2024 या दिवशी माता पालक मेळावा या माता पालकांसोबत संवाद आणि सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे व वक्ता म्हणून सौ अनघा लवळेकर
संचालक, प्रज्ञा मानस संशोधिका ज्ञानप्रबोधिनी पुणे उपस्थित होत्या. या मेळाव्या प्रसंगी सौ. अनघा लवळेकर
यांनी महिलांनी आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे तसेच मुलां सोबत सुसंवाद ठेवून सुसंस्कार केले पाहिजेत याबाबत संवाद साधला. या कार्यक्रम प्रसंगी अनेक विद्यार्थिनी व महिला पालक उपप्राचार्या पूनम रावत, सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन विभाग प्रमुख प्रा. नेहा कुलकर्णी यांनी केले.

Leave a Comment