मएसो सिनियर कॉलेज, पुणे. व मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३०/१२/२०२३ रोजी मएसो सिनियर कॉलेज, पुणे. येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम च्या अंतर्गत प्राध्यापकांसाठी ‘स्व- ओळख ‘ या विषयावर मार्गदर्शन पर सत्र घेण्यात आले.
यासाठी मएसो व्यक्तिमत्व विकास केंद्र, पुणे. येथील तज्ञ मार्गदर्शिका सौ.गिरिजा लिखिते व सौ. स्मिता लोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. यामधे स्व संकल्पना कशी तयार होते, त्यावर परिणाम करणारे घटक कसे असतात व यातून सकारात्मकतेकडे कसे जायचे यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला.