आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म ए सो सिनियर कॉलेज आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 9 मार्च 2024 रोजी उद्योगिनी महिला उद्योग प्रदर्शनाचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. मोनिका मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेविका आणि माजी स्थायी समिती सदस्य तसेच आनंदी ताई पाटील, यशस्वी उद्योजिका, म ए सो नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना सौ. मोनिकाताई मुरलीधर मोहोळ यांनी उद्योग क्षेत्रातील महिला सशक्तिकरण यावर भाष्य व महिलांना उद्योगाबाबत प्रेरित करणे याबाबतचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच आनंदीताई पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपले कलागुण आणि आवड लक्षात घेऊन उद्योग क्षेत्राकडे वळावे व आपले विश्व निर्माण करावे याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना यशस्वी उद्योजक होण्याकरता प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. या उद्योगिनी महिला उद्योजक प्रदर्शन कार्यक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आणि पालकांनी विविध प्रकारच्या उत्पादनांचे, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ, अलंकार, बॅग्स असे स्टॉल्स लावून सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला डॉ. राजीव हजरनीस, श्री विजय भालेराव यांनी सदिच्छा भेट देऊन कौतुक केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ. पूनम रावत, स्टार्ट अप सेल समन्वयक प्रा. निलेश यादव, विभाग प्रमुख प्रा. राहुल शिंदे, डॉ. सुरेखा वैद्य, प्रा. नेहा कुलकर्णी व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. स्टार्टअप इनोवेशन सेल अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.