“म.ए.सो. सीनियर कॉलेज मध्ये निर्भय कन्या अभियान संपन्न झाले. महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य या विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र या मध्ये कार्यरत असणाऱ्या सौ. समृद्धी पानसे यांनी यामध्ये महिलांचे सक्षमीकरण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. मानशास्त्रीय विकास संबंधी सौ.विशाखा जोगदेव मॅडम यांनी मार्गदर्शन केले.तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले. त्या मध्ये चैतन्य बोडके सर यांनी विद्यार्थिनींना अनेक प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या काळामध्ये वापरण्यात आलेल्या युद्धनीतीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण (लाटी-काठी आणि दांड पट्टा) देण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य सर तसेच उपप्राचार्य डॉ. पूनम रावत मॅडम, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सहभागी होते. या मध्ये 104 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुक्मिणी कुलकर्णी हिने केले.”

enmr
Scroll to Top
Skip to content